Showing posts with label I LEAD MY LIFE. Show all posts
Showing posts with label I LEAD MY LIFE. Show all posts

उरलो बनून ज्वलंत प्रेरणा मना-मनात सर्वांच्या


15 ऑगस्ट च्या निमीत्ताने आतापर्यन्त देशासाठी प्राण त्यागणार् या सैनिकांसाठी माझी ही कविता


उरलो बनून ज्वलंत प्रेरणा मना-मनात सर्वांच्या
जरी जगी या उरलो नाही
लाख गोळ्या झेलूनही शत्रच्या या निढळया छाती वरती
किंचीतही मागे सरलो नाही

शत्रुचे इरादे पक्के होते
पण त्याहुनही आमचे ते तोडण्याचे
ते निघाले होते देश तोडाया आमचा
पण आमचा प्रयत्न तो जोडण्याचा

त्यांना वाटले सोपे सारे
कारण जाती-भेद इथे अनेक आहेत
कळे न् त्यांना प्रश्न देशाचा येता
सारे भारतीय एक आहेत

नाही दिसली पत्नी माझी
वाटेला डोळे लावून बसलेली
नाही ऐकली हाक मुलांची हवी हवीशी असलेली
हरलो असेन संसाराशी पण कर्तव्याशी हरलो नाही

उरलो बनून ज्वलंत प्रेरणा मना-मनात सर्वांच्या
जरी जगी या उरलो नाही
लाख गोळ्या झेलूनही शत्रच्या या निढळया छाती वरती
किंचीतही मागे सरलो नाही

जिंदगीसे ज्यादा चाहत है हमे

मित्रांनो,

पहिल्यांदाच हिंदी कविता लिहिलेय. आवडली तर like करा. प्रतिक्रिया कळवा...

जिंदगीसे ज्यादा चाहत है हमे
जिन्दगिया बनाने कि,
सच्चे दिलवाले हो जो लोग
उनके दिलों मे जगह पानेकी

वो ख्वाब ना देखें हम
जो ख्वाबो मे रह जाये,
हम जो दिल से सोचे, चाहे
हर हालत मे वो पाये

ना मिलेगा भगवान
अगर मंदिर, मस्जिद, गुरुद्वारोमे जाओगे
देने की चाह अगर हो दिल मे
तो हर इन्सान की मुस्कान मे उसे पाओगे

बस इतनीसी ख्वाहिश है दिलमे
के मरने से पहले चेहरेपे मुस्कान आये
मरते हुये भी अगर कोई सोचे हमारे बारेमे
तो उसमे भी फिरसे जान आये
तो उसमे भी फिरसे जान आये…

जय हिंद

- विनोद अनंत मेस्त्री

आर्थिक बदलाचा सकारात्मक आनंद मिळवा.

नमस्कार मित्रांनो,
आज एका महत्वाच्या विषयावर आपल्याला सुसंवाद करायचा आहे. त्याआधी कालचा एक किस्सा सांगायला मला आवडेल. संध्याकाळी माझ्या लहान मुलीसाठी खाऊ घेण्यासाठी दुकानात एका शॉप मध्ये गेलो होतो. शॉप चांगल्या पद्धतीने सजविलेले होते. सर्व वस्तू नीट पाहून झाल्यावर मुलीला आवडणा-या तीन-चार लहान लहान खाऊच्या पुड्या घेतल्या, प्रत्येक पुडीवरची किंमत पाहून धसका बसत होता. त्या चार वस्तूंची किंमत २२५/- रुपये सांगण्यात आली. पैसे देवून शॉप मधून बाहेर आलो. डोक्यात विचार आला कि आमचे वडील आम्हा तीन भावांना खावू आणायचे, तेसुद्धा वेगवेगळ्या पद्धतीचा आणि स्वाभिमानाने सांगायचे. खावू पोटभर खा ! आजचा दिवस जेवला नाहीत तरीचालेल. संपूर्ण २०/- रुपये खर्च करून खावू आणला आहे. त्यावेळी मनात विचार आला कि २० वर्षापूर्वी पोटभर खावू तीन भावांना आणि तेही २०/- रुपयांमध्ये आणि आज एकटीसाठी हातातल्या लहानशा पिशवीत खावू घेतला तेही २२५/- रुपयाचा. 
मित्रांनो सांगायचे तात्पर्य एवढेच कि सतत वाढणा-या महागाईमुळे आपण आपल्या गरजा भागविण्यासाठी अपुरे पडत आहोत. मेहनत जास्त, मिळणारा मोबदलाही जास्त तरीही तडजोड करावी लागते. वर्तमानाची चिंता असताना भविष्यात काय होईल याचा विचार करून घाम सुटतो. 
ह्यावर एकच उपाय आणि तो म्हणजे योग्य प्रकारे भविष्यासाठी केलेली गुंतवणूक. 
मित्रांनो गुंतवणूक हा शब्द आपण निश्चितच ऐकला असेल. सेमिनार-लेख यातून ऐकला, वाचला असेल, तरीही फरक मात्र जसा व्हायला पाहिजे तसा होत नाही. ह्याला कारण स्वयं शिस्तीचा अभाव आणि आर्थिक शिक्षणाची पुरेपूर माहिती नसणे. म्हणूनच मित्रांनो गुंतवणूक विषय जितका जटील तितकाच महत्वाचा. 

१. पैशाची गुंतवणूक करणे महत्वाची आहे का ?
होय…
  • महागाईवर मात करण्यासाठी
  • भविष्यासाठी 
  • माझ्या आर्थिक स्वप्नांच्या पूर्ततेसाठी
२. गुंतवणूकेची नियोजन आवश्यक आहे का ?
होय… 
  • भविष्यातील येणा-या आर्थिक संकटांना सामोरे जाण्यासाठी, आणि त्या दिशेने योग्य वाटचालीसाठी
  • तुमच्या नंतर तुमचे कुटुंब आर्थिक दृष्ट्या सुखी होण्यासाठी 
  • मुलांचे शिक्षण आणि Retirement Planning करण्यासाठी
  • Tax Out Flow कमी करण्यासाठी 
मित्रांनो, या सर्व गोष्टींची आपणास गरज आहे त्यासाठी "आय लीड माय लाइफ़" उपक्रमाअंतर्गत वरील सर्व गोष्टींचे ज्ञान तुमच्या पर्यंत पोहोचविणे, दोन महिन्यांच्या कालावधीत स्वत:मध्ये आर्थिकदृष्ट्या बदल घडविण्यासाठी, तुमची निर्णय क्षमता वाढविणे हेच आमचे उद्दिष्ट असणार आहे. 

मोठ्या संख्येने सामील व्हा ! आणि आर्थिक बदलाचा सकारात्मक आनंद मिळवा. 

धन्यवाद 
- सुनिल कानाळ  (आपला आर्थिक शुभचिंतक)

"आय लीड माय लाइफ़" - पर्व दुसरे


"जिंदगी हसने गाने  के लिये है पल दोपल" आपले शिक्षणाचे - कॉलेजचे दिवस असेच असतात. एक स्वप्नांची सुंदर दुनिया, कुठली प्रचंड मोठी जबाबदारी नाही. कुठलं मोठ टेन्शन नाहि. कॉलेज कट्टा, मित्र-मैत्रिणी, कॉलेजच्या कॅन्टीनमधला समोसा,  वडापाव, मिसळपाव, तासन तास गप्पा, सगळ काही स्वप्नवत. कधीही न संपावस वाटणारं स्वप्न. "बस ! सब ऐसाही चलता रहे." 
पण कधीतरी हे स्वप्न संपणार असत. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल कि आई-वडील आपल्याकडे अपेक्षेने पाहू लागतात. एक बैल थकला कि दुसरा बैल  घाण्याला जुंपावा तसं आपल्याला जबाबदारीच्या घाण्याला जुंपून घ्याव लागतं. मग समोर असत ते कठोर वास्तव.  
सकाळी ठरलेल्या वेळेवर बस किंवा ट्रेन पकडा. वेळेवर कामाला पोहचा. दिवसभर ठरलेल्या तारखेला मिळणा-या पगाराच्या अपेक्षेने प्रचंड मेहनत घ्या. संध्याकाळी बॉसने ठरवलेल्या वेळेनुसार ऑफिसमधून निघा. पुन्हा लोकल पकडा, घरी या,जेवून घ्या, टि.व्हि. बघा आणि झोपा. दुस-या दिवशी पुन्हा तशाच दिसणा-या दिवसाला सामोरे जाण्यासाठी सज्ज व्हा.  
"जाने कहां गए ओ दिन" असं सातत्याने वाटयाला लागतं. हळूहळू समस्या अतिशय वेगाने वाढायला लागल्यात अस वाटू लागतं. दिवस भराच्या धावपळीत गडबडीत स्वप्न:कडे पाहन राहून जातं. अत्यंत भयंकर अशा चक्रात आपण अडकून जातो. जगण्याची गोडी हळूहळू कमी होवू लागते आणि जीवन जगणे हि फक्त आणि फक्त एक 'फॉंरमँलिटी' बनते. पण मित्रानो हे ते आयुष्य नाहीये ज्यासाठी आपण जन्म घेतलाय.  लागतं आयुष्य यापेक्षा वेगळ असायला हव. मी कसं जगावं हे परिस्थितीने, माझ्या कुटुंबाने, या दुनियेने ठरवू नये. माझ्या आयुष्याची स्टोरी इतरांनी का लिहावी ?  ती मी स्वत: लिहियला हवी . माझे जीवन, माझ्या भावना, माझी प्रगती, माझी स्वप्न, माझी नाती, माझा अर्थ (पैसा) या सर्वांवर माझं नियंत्रण असायला हवं. माझ आयुष्य माझ्या नियात्रणात असायला हवं
"आयुष्य जगण्याचे दोन मार्ग असतात, एकतर स्वत:च्या स्वप्नांसाठी जागा, नाहीतर दुस-यांची स्वप्नासाठी."
मला माझ्या स्वप्नांसाठी जगायचय, मला जे हवय ते मला चांगल्या मार्गाने मिलवायचय. माझ्या आयुष्याचा हेतू फक्त स्वत:पुरता मर्यादित आयुष्य जगण्याचा नाही तर मला या समाजाला आणि देशाला काही योगदान करायचय. मला एक प्रभावी व्यक्तिमत्व, एक उदाहरण बनायचय. पण हे सगळ कस शक्य होवू शकत ?
याचसाठी आम्ही "I Lead My Life" हा उपक्रम तयार केला आहे आणि याचा पहिला पर्व ७ जुलै, २०१३ तारखेला यशस्वीरित्या पूर्ण झाला. या उपक्रमात एकूण चार सत्रांचा समावेश आहे. 

सत्र क्र. १ : Self Mastery (स्वत:वर विजय) 

या सत्रात आपल्या समजुती, ज्या जीवनावर प्रचंड परिणाम करत असतात, त्या समजुतींवर काम केले जाते. स्वत:ला विकसित करण्यासाठी हि सर्वात पहिली आणि अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आणि याची तुम्हा आम्हा सर्वांनाच गरज आहे. शिवाय या सत्रात आपल्या भावनांवर विजय कसा मिळवावा हे देखील शिकता येणार आहे. 

सत्र क्र. २ : Body Language & Communication Skill. (देहबोली आणि संभाषण कौशल्य)

उत्कृष्ट संभाषण हि काळाची गरज आहे. मी प्रचंड हुशार आहे, बुद्धिमान आहे. पण हि बुद्धिमत्ता आपल्या संभाषणातून दिसली नाहि, आपल्या देहबोलीतून दिसली नाही तर व्यर्थ आहे. 
मला Interview ला समोर जायला भीती वाटते 
मला चार चौघात बोलायला भीती वाटते 
मला नवीन व्यक्तींसोबत ओळख करायला, त्यांच्याशी बोलायला भीती वाटते 
आपल्यापेक्षा प्रभावी व्यक्तिमत्वाशी संभाषण कसं साधाव ते मला कळत नाही 
मला सभांमध्ये, स्टेजवर बोलण्याची भीती वाटते 
या जर आपल्या समस्या असतील तर त्यावर उपाय हे सत्र आहे. 

सत्र क्र. ३ : Finance Mastery (आर्थिक विजय)

महागाई प्रचंड वेगाने वाढत आहे. त्या वेगाने मिळकत वाढत नाहि. महागाई सोबत स्पर्धा करण माझ्या मिळकतीला कठीण जातंय. गुंतवणुकीचे योग्य मार्ग मला माहित नाहीत. सध्याच्या आर्थिक तडजोडीना मी कंटाळलो आहे. पैशाच्या अभावी मला हव तस आयुष्य जगता येत नहिये. मी पैशाच्या मागे धावून थकलो आहे. पैसा माझ्यासाठी काम कसा करू शकतो हे मला माहित नाहि. जर आपल्या या समस्या असतील तर त्याचं उत्तर हे सत्र आहे

सत्र क्र. ४ : Good To Great (चांगलेपनाकडुन महानातेकडे)

देवाने आपल्याला स्वार्थी किंवा स्वत:पुरते तडजोडीचे आयुष्य जगण्यासाठी पाठवलेले नाहि. त्याने आपल्याला एका खास हेतूने या पृथ्वीतलावर पाठवले आहे. या जगातील ९०% हून अधिक लोकांना हा हेतू कधी सापडत नाही किंबहुना ते शोधण्याच्या भानगडीत पडत नाहि आणि मरेपर्यंत एक सामान्य निरर्थक आयुष्य जगतात. हा सत्र आपल्याला जीवनाचा हेतू शोधण्यास मदत करेल. 
आपल्या आयुष्याचा नेमका हेतू काय ?
आपला जन्म नेमका कशासाठी ?  आणि तो कसा शोधावा ?  
हेतू प्राप्त करण्याचे मार्ग काय ?  
Strategic Planning म्हणजे काय ?
या स्पर्धात्मक युगात एक करिअर पुरेसा नाही मग एकाहून अधिक मिळकतीचे मार्ग कसे शोधावेत आणि राबवावेत ?
जगण्याचा मनमुराद आनंद कसा लुटावा ?
या जगाला योगदान कसे करावे ?
येणा-या पिढीसाठी उदाहरण कसे बनावे ? 
अपयशाला यशामध्ये रुपांतरीत कसे करावे ?
याच सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला या सत्रात मिळतील. 
तुमच्या जीवनाला योग्य दिशा देण्यासाठी "I Lead" ची संपूर्ण टीम सज्ज झाली आहे. गरज आहे ती तुमच्या निर्णयाची. एक निर्णय जो तुमच आयुष्य बदलेल. "I Lead My Life" च्या लीडर समूहात प्रवेश करण्यासाठी आजत संपर्क साधा…

आपला पर्व क्र. २ हा रविवार, दिनांक ४ ओगस्ट, २०१३ तारखेला सुरु होणार आहे. 

अधिक माहितीसाठी संपर्क साधा… 
022-65515004 / 8655850056 / 9819453533

I Lead My Life - पहिला पर्व पूर्ण झाल्या निमित्ताने

I Lead My Life - पहिला पर्वाचा पुरस्कार सोहळा गेल्या रविवारी (७ जुलै, २०१३) पार पडला. माझ्या आयुष्यातील अत्यंत अविस्मरणीय क्षणांपैकी हा एक होता.  
त्याची ३ कारणे आहेत. 
एक - या सोहळ्यात माझ एक स्वप्न सुरु झालं होत ते म्हणजे मध्यमवर्गीय विभागातील मुलांसाठी "व्यक्तिमत्व विकासाचे" धडे देणारा एखादा उपक्रम माफक दरामध्ये चालू करणे आणि हा उपक्रम चालू झाला होता… 
दोन - या उपक्रमा अंतर्गत पहिल्या पर्वामधून १७ जनांनी या उपक्रमाची ताकद अनुभवली आणि त्यांच्या नवीन जीवनाची वाटचाल सुरु सुरु झाली. 
तीन - या उपक्रमाच्या पूर्तता सोहळ्यात माझे तीन आदर्श एकत्र हजर होते. मी ज्या शाळेत शिकलो त्या शाळेतील सौ. पळशीकर बाई, राष्ट्रपती पदक विजेते पोलिस निरीक्षक श्री. संजय गोविलकर आणि सुप्रसिद्ध गुंवणूक तज्ञ श्री. अरुण सिंघ. 

या उपक्रमा अंतर्गत अत्यंत महत्वाच्या अशा चार गोष्टींवर आपण काम करतो. एक म्हणजे "आपल्या समजुती (Belief Syster – Self Mastery)", दुसरी "संभाषण कौशल्य आणि देह बोली (Communication Mastery)" तिसरी "आर्थिक नियोजन (Financial Mastery)" आणि चौथी म्हणजे "चांगलेपणाकडून महानातेकडे (Good To Great)”.

या संपूर्ण उपक्रमात ४२ दिवसांचा कालावधी प्रचंड अनुभव देऊन गेला. मुलांमध्ये होत असलेले बदल पाहून विश्वास प्रबळ होत गेला. समजुती ख-या किंवा खोट्या नसतात. त्या एकतर उपयुक्त असतात किंवा मर्यादा आणणा-या असतत. समजुतींवर काम करतानाचा एक अनुभव तुम्हाला सांगावासा वाततो. पहिला Session  - Self Mastery झाल्यानंतर माझा मुलांसोबत One To One Session होत असतात. त्यामध्ये मी मुलांची एखादी मर्यादा आणणारी समजूत बदलणार असतो.

प्रियांका नावाची माझी विद्यार्थिनी जी या उपक्रमच्या सुरुवाती आधी अत्यंत खचलेली होती आणि उपक्रम संपताना ती "Star Leader Award" जिंकून गेलि. या प्रियांका सोबत One To One Session चालू असताना तिने तिची मर्यादा आणणारी एक समजुत बदलण्यासाठी निवडली, ती म्हणजे "मला स्वत:च मत नाहि !'
मी तिला विचारले "अस तुला का वाटत ?"
"कारण मला काहीही करायचं असेल तर दुस-याला विचारव लागत, छोट्यात छोटी गोष्ट असली तरी सुद्धा ! मी कपडे जरी विकत घ्यायला गेले तरी सोबत कुणाला तरी न्याव लागत. मला काहीही करायच असेल तर मला माझ्या आईला, मोठ्या भावाला विचारल्या शिवाय ते करायला भीती वाटते, इत्यादी इत्यादी…. 

"या सर्व गोष्टींमुळे तुला वाटत कि तुला स्वत:च मत नाही"
"हो, अगदी !"
"अच्छा मला सांग, तुझी सर्वात जवळची मैत्रीण कोणती ?"
"of course प्रज्ञा"
"का ?"
"कारण, माझ्या प्रत्येक अडत्या वेळी तिने मला साथ दिलेय,  सावरलाय."
"म्हणजे या प्रज्ञा सोबत मैत्री करणं हा तुझ्या आयुष्यातला सर्वात Best Decision होता… Right ?"
"हो… शंकाच नाही"
मग हा Decision घेताना तू कोणाच मत घेतलं होतस ?"
"कोणाच नाही"
"मग, याचा अर्थ तुला तुझ मत आहे… Right  ?"
"हो"

या वेळी प्रियांकाचा चेहरा बघण्यासारखा होत. तिला तिच्या प्रश्नाचे उत्तर मिळालं होत. तिच्या नव्या रूपाशी तिची ओळख झाली होती. अशा प्रकारे प्रियांकाची समजूत "मला स्वत:च मत नाही" एका क्षणात बदलली. 

अशाच कित्येक मर्यादा आणणा-या समजुती आपण बाळगून आहोत. ज्या एका क्षणात बदलू शकतात आणि ते बदलण्यासाठी मदत करण्यास आम्ही सज्ज झालो आहोत. गरज आहे ती तुमच्या प्रोत्साहनाची आणि पाठबळाची. 

देश बदलण्याच प्रचंड सामर्थ्य या मध्यम वर्गीय पिढीमध्ये दडलेलं आहे. त्या सामर्थ्याची आम्ही या पिढीला ओळख पटवून देत आहोत. जग बदलायचं असेल तर प्रथम स्वत:ला बदलाव लागतं आणि हा बदल तुमच्यात घडवण्याच काम I Lead My Life करत आहे. 

असेच I Lead चे किस्से घेवून भेटत राहू… धन्यवाद !!!

- विनोद अनंत मेस्त्री 





असामान्य यशप्राप्तीच्या आठ समजुती...

नमस्कार मित्रांनो,
आपण आपलं आयुष्य समजुतींवर जगत असतो. माणूस हा समजुतींचाच बनलेला असतो (Man is what he believes). आपल्या समजुती अप्रत्यक्ष पणे आपल्या विचारांवर, कृतींवर तसेच शरीरावर परिणाम करत असतात. माझा प्रबळ विश्वास आहे कि आपण जे मानतो ते आज न उद्या घडणारच आहे आणि ते घडते. अनेक वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनानुसार हे सिद्ध झालेले आहे कि समजुती आपल्या जीवनावर प्रचंड परिणाम करतात. 
आता पुढील घटना वाचा आणि विचार करा...
एका Freezer मालवाहू ट्रेन मध्ये काम करणारा एक कर्मचारी ट्रेन सुटायला २ तास आहेत हे लक्षात घेऊन फ्रीझर डब्यात झोपला. एका तासाभरात जाग येईल असा त्याचा अंदाज होता. परंतु त्याला जेव्हा जाग आली तेव्हा ट्रेन चालू झाली होती. अशा ट्रेन मध्ये फक्त पहिल्या आणि शेवटच्या डब्यात कर्मचारी आणि मध्ये सगळे फ्रीजरचे डबे असतात. पुढील स्टेशन २ तासावर. फ्रीझर चालू रहाणार आणि तापमान गोठण बिंदूच्या खाली जाणार आणि आपण गोठून मारणार या भीतीने त्याचा थरकाप उडाला. दोन तासानंतर ट्रेन पुढील स्टेशनवर पोहचली आणि हा कर्मचारी मृत अवस्थेत सापडला. post mortem report नुसार त्याचा मृत्यू गोठून झाला होता. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या डब्यातला फ्रीजर बंध होता. 
हे सगळ्यात उत्तम उदाहरण आहे कि नुसतं गोठून मारणार या मानण्याने त्या कर्मचाऱ्याचा गोठून मृत्यू झाला. 
समजुती खऱ्या किंवा खोट्या नसतात. त्या एकतर तुम्हाला पुढे घेऊन जाणाऱ्या (useful Beliefs) असतात किंवा तुमच्यावर मर्यादा आणणाऱ्या (Limiting Beliefs) असतात. यशस्वी व्हायचं असेल तर मर्यादा आणणाऱ्या समजुती बदलणं आणि पुढे नेणाऱ्या समजुती स्वीकारणं गरजेचं असतं. 
या जगातील कित्येक यशस्वी लोकांचा अभ्यास केल्यास त्यांच्या अनेक प्रभावी समजुती हाती लागतात. त्यातील अत्यंत महत्वाच्या अशा  आठ समजुती तुमच्यासमोर या सेमिनार मार्फत सादर केल्या जाणार आहेत. ज्या आपण समजून घेतल्या आणि मानल्या तर यश निश्चितच ! 

या सेमिनार मधून आपण काय शिकाल?
१. समजुती आणि Positive Thinking या मधील फरक. 
२. समजुतींचा आपल्या जीवनावर होणारा परिणाम.  
३. आपण जे जीवन जगतोय ते केवळ आपल्या समजुतींमुळे. 
४. समजुती बदलून आपलं जग कसं बदलू शकतं. 
५. यशस्वी होण्यासाठी कोणत्या आठ समजुती आपण बाळगायला हव्यात? 

हा सेमिनार कोणासाठी?
जीवनात यशस्वी होण्याची आणि आहे ती परिस्थिती बदलण्याची इच्छा असलेल्या त्या प्रत्येकासाठी.

चला तर मग तयार होवुया आपलं जग बदलायला…  



वक्ते : विनोद अनंत मेस्त्री 
M.Com, C.S. Inter, NLP Practitioner,


रविवार, दिनांक 7 जुलै 2013,
वेळ : सकाळी 10.30 वाजता 
पत्ता : गोवंडी गावदेवी ट्रस्ट हॉल, कुर्ला नागरिक बँक समोर, गोवंडी, मुंबई - 400 088
प्रवेश शुल्क : विनामुल्य          

अधिक माहितीसाठी संपर्क साधा : 
022-65515004 / 8655850056 / 9819453533

प्रवेश पत्रिका आवश्यक



"I LEAD MY LIFE" My Life My Control...



Learn how to live life in their own way!

This is leadership development program for graduate working students who want to achieve the best out of their lives which includes powerful skills required to live life we want and excel in competitive world.


SELF MASTERY
We are what we believe. Our beliefs make our world. If we are failing to get success, it can be because of the set of beliefs we have. Changing limiting beliefs to the useful beliefs will help you get all that what you want out of life.
  • Finding out limiting beliefs.
  • Changing limiting beliefs to the most useful one.
  • Learning how to identify our emotions.
  • Positive emotions and their effective use.
  • Negative emotions and their positive use.
  • How to maintain positive state always.
  • Relaxation techniques.

COMMUNICATION MASTERY
One who can win his tongue can definitely win the world. Effective communication is a way to enter people's heart. Learning and understanding communication styles of people and communicating accordingly helps us connecting with people. In this session we learn 10 fundas of effective communication.
  • Understanding Communication model.
  • Understanding Communication Styles of people and communicating accordingly.
  • How to communicate effectively in first meeting.
  • Rapport Building.
  • Body language and it’s effective use.
  • Tips on Public speaking – meetings, social events, on stage etc.
  • Effective Listening.

FINANCIAL MASTERY
Inflation is reaching a terrible height every
year. Unfortunately, our income doesn't raise at same speed which causes short of finance
which in turn result in frustration.
In this session, we learn how to plan our money from present income and can create a wealth. No inflation can dare to beat us.
  • Difference between saving and investment
  • Introduction to Share Market, Mutual Funds, Commodity Market etc.
  • How to create wealth.
  • Managing risk in investment.
  • Preparing own portfolio.
  • How to get financially retire at the age of 35-40.

GOOD TO GREAT
We are basically ‘Good’ people. We are born as a normal human being. But we must die contributing something great to the world. That would be real success. In this session  we will learn how to reach category of ‘Great’ People by finding ultimate purpose of your life and working on it.
  • Finding Purpose
  • Deciding Midway Stops
  • Building Capabilities
  • Strategic Planning and Execution
  • Success-failure equation
  • Enjoying the Process
  • Being an Example
Workshop will start from 9th June to 30th June 2013. Morning 8am to 12pm. 
Venue : PN 391, Navin Nagar, Ground Floor, N. G. Acharya Marg, Borla-Govandi, Mumbai - 400 088.
Contact : 022-6551 5004 / 8655850056 / 9819453533
Related Posts Plugin for WordPress, Blogger...