४ जुलै २०१२ , मराठी
बिझनेस क्लब मध्ये वी आय पी गेस्ट म्हणून बोलण्यात आले होत . mbc सदस्यांचा उत्साह
, मिटिंग राबवण्याची पद्धत आणि एकमेकांबद्दल सहकार्याची भावना पाहून थक्क झालो .मराठी
उद्योजकांसाठी व्यवसाय बुद्धीची अत्यंत उत्तम योजना म्हणजे MBC मिटिंग. नेट्वर्किंग
च्या संकल्पनेवर आधारलेल्या मराठी बिझनेस क्लब म्हणजे उद्योजकांसाठी सुवर्ण संधी म्हणता
येईल . नेट्वर्किंग म्हटलं तर नवनवीन लोकांना भेटणं आलं, ओळख करणं, ओळख वाढवणं
आणि टिकवणं आलं. परंतु प्रथमच एखाद्या व्यक्तीला भेटल्यावर तिच्याशी ओळक कशी करावी
? बोलण्याची सुरवात कशी करावी ? संभाषण कसं वाढवावं ? आणि त्या एकाच भेटीत त्या व्यक्तीला
आपलसं कसं करावं हे प्रश्न कित्येकांना पडत असतात. या सर्व प्रश्नांची उत्तर म्हणून
मी हि पोस्ट लिहित आहे. याचा आपणाला निश्चितच फायदा होईल याची मला खात्री आहे.
त्यासाठी काही टिप्स खालील प्रमाणे :-
समोरच्या आवडीच्या विषयाने सुरवात :- मानवाबद्दल एक नैसर्गिक
गोष्ट आपण सर्वांनी लक्ष्यात घ्यायला हवी, ती म्हणजे, आपल्यातील प्रत्येकाला एका गोष्टीत
प्रचंड रस असतो आणि ती गोष्ट म्हणजे आपण स्वतः. "प्रत्येक व्यक्तीचा प्रचंड आवडीचा
विषय म्हणजे, ती स्वतः" असते. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीला भेटल्यावर तिच्या
विषयी प्रश्न विचारा.
उदारण :- "आपण काय करता ?" किवा "आपण कोणत्या क्षेत्रात आहात ?" "आपला गावं ?" "तसे आपण राहायला कुठे आहात ?" किवा त्या व्यक्तीकडे असलेल्या एखाद्या वस्तूचा आधार घेऊन आपण सुरवात करू शकता "nice watch, how is it.. नाही म्हणजे मलासुद्धा असेच घड्याळ घ्यायचय परंतु गोंधळात आहे कोणत्या कंपनीचं घ्यायचं. तुम्हाला या कंपनीचा अनुभव कसा आहे ?" एखाद्या व्यक्तीला तिच्या स्वतःबद्दल विचारणे हा सर्वात उत्तम communication starter मानला जातो.
उदारण :- "आपण काय करता ?" किवा "आपण कोणत्या क्षेत्रात आहात ?" "आपला गावं ?" "तसे आपण राहायला कुठे आहात ?" किवा त्या व्यक्तीकडे असलेल्या एखाद्या वस्तूचा आधार घेऊन आपण सुरवात करू शकता "nice watch, how is it.. नाही म्हणजे मलासुद्धा असेच घड्याळ घ्यायचय परंतु गोंधळात आहे कोणत्या कंपनीचं घ्यायचं. तुम्हाला या कंपनीचा अनुभव कसा आहे ?" एखाद्या व्यक्तीला तिच्या स्वतःबद्दल विचारणे हा सर्वात उत्तम communication starter मानला जातो.
OPEN ENDED प्रश्न विचारा :- संवाद वाढवण्यासाठी नेमही OPEN ENDED प्रश्नांचा वापर करावा. म्हणजे असे प्रश्न ज्याचे उत्तर विस्तृत मिळेल.
उदारण :- "मला या गोष्टी बदल तुमच्या कडून काही माहिती मिळेल?" "तुम्ही हेच क्षेत्र का निवडले ?" शक्यतो ' yes /no ' प्रकारचे प्रश्न टाळावेत म्हणजे असे प्रश्न ज्याचे उत्तर फक्त 'हो' किंवा 'नाही' मध्ये येईल अशा प्रश्नांचा वापर करू नये. ' yes /no' प्रकारची प्रश्नांची संभाषणे तिथेच थांबवा. OPEN ENDED प्रश्नामुळे संभाषण बहरत जात.
मत विचारा :-" या अमुक गोष्टीबद्दल आपलं काय मत आहे ?" हा संभाषण उत्तेजित करणारा उत्तम प्रश्न आहे. कारण प्रत्येकाला आपला मत मांडायला आवडत. परंतु हा प्रश्न विचारताना एक गोष्ट लक्ष्यात घ्यावी ती म्हणजे आपण त्यांना ज्या गोष्टी बद्दल मत विचारतोय, तो त्या व्यक्तीचा आवडीचा माहितीचा विषय असायला हवा !
परिणामकारक ऐकण:-प्रत्येकाला ऐकणारा हवा असतो हा नियम लक्ष्यात घेऊन, जेव्हा समोरची व्यक्ती बोलत असेल तेव्हा त्याच बोलण काळजीपूर्वक ऐका, समजून घेण्यासाठी ऐका. ऐकून घेतल्याने आपण समोरच्या व्यक्तीला आपलेसे वाटायला लागतो. त्यामुळे आपला संपूर्ण लक्ष त्याचं/तिचं बोलण ऐकण्याकडे केंद्रित करा. ( परिणाम कारक ऐकण, याबद्दल विस्तृत लिहून माझा ब्लोग vinodmestry.blogspot.com वर लवकरच पोस्ट करण्याचा प्रयत्न करेन.)
उदारण :-"sir / madam, धन्यवाद आपल्याकडून ब-याच नव्या गोष्टी समजल्या. तुमच्यासोबत बोलून आनंद वाटला. I hope पुढेही असेच सहकार्य कराल."एक गोष्ट ध्यानात असू द्या, वरील सर्व गोष्टी नैसर्गिकरित्या व्हायला हव्यात, त्यात नाटकीपणा नसावा.
पुढे आपल्याशी संवाद माझ्या ब्लोग मधून साधणार आहेच. तो पर्येंत all the best and as i always
believe, you all are the best
धन्यवाद
Reff. Book : रिचार्ज
- आयुष्याची पुनर्बांधणी (लेखक : संजय गोविलकर)
-
विनोद अनंत मेस्त्री (9819453533)
No comments:
Post a Comment