"जिंदगी हसने गाने के लिये है पल दोपल" आपले शिक्षणाचे - कॉलेजचे दिवस असेच असतात. एक स्वप्नांची सुंदर दुनिया, कुठली प्रचंड मोठी जबाबदारी नाही. कुठलं मोठ टेन्शन नाहि. कॉलेज कट्टा, मित्र-मैत्रिणी, कॉलेजच्या कॅन्टीनमधला समोसा, वडापाव, मिसळपाव, तासन तास गप्पा, सगळ काही स्वप्नवत. कधीही न संपावस वाटणारं स्वप्न. "बस ! सब ऐसाही चलता रहे."
पण कधीतरी हे स्वप्न संपणार असत. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल कि आई-वडील आपल्याकडे अपेक्षेने पाहू लागतात. एक बैल थकला कि दुसरा बैल घाण्याला जुंपावा तसं आपल्याला जबाबदारीच्या घाण्याला जुंपून घ्याव लागतं. मग समोर असत ते कठोर वास्तव.
सकाळी ठरलेल्या वेळेवर बस किंवा ट्रेन पकडा. वेळेवर कामाला पोहचा. दिवसभर ठरलेल्या तारखेला मिळणा-या पगाराच्या अपेक्षेने प्रचंड मेहनत घ्या. संध्याकाळी बॉसने ठरवलेल्या वेळेनुसार ऑफिसमधून निघा. पुन्हा लोकल पकडा, घरी या,जेवून घ्या, टि.व्हि. बघा आणि झोपा. दुस-या दिवशी पुन्हा तशाच दिसणा-या दिवसाला सामोरे जाण्यासाठी सज्ज व्हा.
"जाने कहां गए ओ दिन" असं सातत्याने वाटयाला लागतं. हळूहळू समस्या अतिशय वेगाने वाढायला लागल्यात अस वाटू लागतं. दिवस भराच्या धावपळीत गडबडीत स्वप्न:कडे पाहन राहून जातं. अत्यंत भयंकर अशा चक्रात आपण अडकून जातो. जगण्याची गोडी हळूहळू कमी होवू लागते आणि जीवन जगणे हि फक्त आणि फक्त एक 'फॉंरमँलिटी' बनते. पण मित्रानो हे ते आयुष्य नाहीये ज्यासाठी आपण जन्म घेतलाय. लागतं आयुष्य यापेक्षा वेगळ असायला हव. मी कसं जगावं हे परिस्थितीने, माझ्या कुटुंबाने, या दुनियेने ठरवू नये. माझ्या आयुष्याची स्टोरी इतरांनी का लिहावी ? ती मी स्वत: लिहियला हवी . माझे जीवन, माझ्या भावना, माझी प्रगती, माझी स्वप्न, माझी नाती, माझा अर्थ (पैसा) या सर्वांवर माझं नियंत्रण असायला हवं. माझ आयुष्य माझ्या नियात्रणात असायला हवं.
"आयुष्य जगण्याचे दोन मार्ग असतात, एकतर स्वत:च्या स्वप्नांसाठी जागा, नाहीतर दुस-यांची स्वप्नासाठी."
मला माझ्या स्वप्नांसाठी जगायचय, मला जे हवय ते मला चांगल्या मार्गाने मिलवायचय. माझ्या आयुष्याचा हेतू फक्त स्वत:पुरता मर्यादित आयुष्य जगण्याचा नाही तर मला या समाजाला आणि देशाला काही योगदान करायचय. मला एक प्रभावी व्यक्तिमत्व, एक उदाहरण बनायचय. पण हे सगळ कस शक्य होवू शकत ?
याचसाठी आम्ही "I Lead My Life" हा उपक्रम तयार केला आहे आणि याचा पहिला पर्व ७ जुलै, २०१३ तारखेला यशस्वीरित्या पूर्ण झाला. या उपक्रमात एकूण चार सत्रांचा समावेश आहे.
सत्र क्र. १ : Self Mastery (स्वत:वर विजय)
या सत्रात आपल्या समजुती, ज्या जीवनावर प्रचंड परिणाम करत असतात, त्या समजुतींवर काम केले जाते. स्वत:ला विकसित करण्यासाठी हि सर्वात पहिली आणि अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आणि याची तुम्हा आम्हा सर्वांनाच गरज आहे. शिवाय या सत्रात आपल्या भावनांवर विजय कसा मिळवावा हे देखील शिकता येणार आहे.
सत्र क्र. २ : Body Language & Communication Skill. (देहबोली आणि संभाषण कौशल्य)
उत्कृष्ट संभाषण हि काळाची गरज आहे. मी प्रचंड हुशार आहे, बुद्धिमान आहे. पण हि बुद्धिमत्ता आपल्या संभाषणातून दिसली नाहि, आपल्या देहबोलीतून दिसली नाही तर व्यर्थ आहे.
मला Interview ला समोर जायला भीती वाटते
मला चार चौघात बोलायला भीती वाटते
मला नवीन व्यक्तींसोबत ओळख करायला, त्यांच्याशी बोलायला भीती वाटते
आपल्यापेक्षा प्रभावी व्यक्तिमत्वाशी संभाषण कसं साधाव ते मला कळत नाही
मला सभांमध्ये, स्टेजवर बोलण्याची भीती वाटते
या जर आपल्या समस्या असतील तर त्यावर उपाय हे सत्र आहे.
सत्र क्र. ३ : Finance Mastery (आर्थिक विजय)
महागाई प्रचंड वेगाने वाढत आहे. त्या वेगाने मिळकत वाढत नाहि. महागाई सोबत स्पर्धा करण माझ्या मिळकतीला कठीण जातंय. गुंतवणुकीचे योग्य मार्ग मला माहित नाहीत. सध्याच्या आर्थिक तडजोडीना मी कंटाळलो आहे. पैशाच्या अभावी मला हव तस आयुष्य जगता येत नहिये. मी पैशाच्या मागे धावून थकलो आहे. पैसा माझ्यासाठी काम कसा करू शकतो हे मला माहित नाहि. जर आपल्या या समस्या असतील तर त्याचं उत्तर हे सत्र आहे
सत्र क्र. ४ : Good To Great (चांगलेपनाकडुन महानातेकडे)
देवाने आपल्याला स्वार्थी किंवा स्वत:पुरते तडजोडीचे आयुष्य जगण्यासाठी पाठवलेले नाहि. त्याने आपल्याला एका खास हेतूने या पृथ्वीतलावर पाठवले आहे. या जगातील ९०% हून अधिक लोकांना हा हेतू कधी सापडत नाही किंबहुना ते शोधण्याच्या भानगडीत पडत नाहि आणि मरेपर्यंत एक सामान्य निरर्थक आयुष्य जगतात. हा सत्र आपल्याला जीवनाचा हेतू शोधण्यास मदत करेल.
आपल्या आयुष्याचा नेमका हेतू काय ?
आपला जन्म नेमका कशासाठी ? आणि तो कसा शोधावा ?
हेतू प्राप्त करण्याचे मार्ग काय ?
Strategic Planning म्हणजे काय ?
या स्पर्धात्मक युगात एक करिअर पुरेसा नाही मग एकाहून अधिक मिळकतीचे मार्ग कसे शोधावेत आणि राबवावेत ?
जगण्याचा मनमुराद आनंद कसा लुटावा ?
या जगाला योगदान कसे करावे ?
येणा-या पिढीसाठी उदाहरण कसे बनावे ?
अपयशाला यशामध्ये रुपांतरीत कसे करावे ?
याच सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला या सत्रात मिळतील.
तुमच्या जीवनाला योग्य दिशा देण्यासाठी "I Lead" ची संपूर्ण टीम सज्ज झाली आहे. गरज आहे ती तुमच्या निर्णयाची. एक निर्णय जो तुमच आयुष्य बदलेल. "I Lead My Life" च्या लीडर समूहात प्रवेश करण्यासाठी आजत संपर्क साधा…
आपला पर्व क्र. २ हा रविवार, दिनांक ४ ओगस्ट, २०१३ तारखेला सुरु होणार आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क साधा…
022-65515004 / 8655850056 / 9819453533
No comments:
Post a Comment